Ad will apear here
Next
‘डीकेटीई’चा ‘हॅपेसेन-व्हिएतनाम’शी सामंजस्य करार


इचलकरंजी : विद्यार्थी कल्याणासाठी व उद्योजकतेला देण्याच्या हेतूने डीकेटीईचा व्हिएतनाम देशातील हॅपेसेन या कंपनीशी सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत व्हिएतनाममधील विद्यार्थ्यांना या कंपनीच्या माध्यमातून डीकेटीईमध्ये सुरू असलेल्या फॉरेन कोट्याअंतर्गत शिक्षण पूर्ण करता येणार आहे. शिवाय ‘डीकेटीई’मधील उपलब्ध टेक्नॉलॉजीचा लाभ व्हिएतनाममधील उद्योगांना होणार असून, तेथील इंडस्ट्रीसाठी उपयुक्त अभ्यासक्रमाची डिझाइन करण्यासाठी डीकेटीई मदत करणार आहे.

या करारांतर्गत व्हिएतनाममधील विद्यार्थी डीकेटीईमध्ये पदवी, पदव्युत्तर व पीएचडीचे शिक्षण पूर्ण करू शकतील. या शिवाय व्हिएतनाममधील टेक्स्टाइल उद्योजकांना डीकेटीईमध्ये इंडस्ट्री ट्रेनिंग घेऊन तेथील उद्योग वाढीसाठी डीकेटीईमार्फत चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे  इचलकरंजीतील उद्योजक व्हिएतनाम येथे जाऊन तेथील उद्योजकांना उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. व्हिएतनाम येथील टेक्स्टाइल कार्याचा विस्तार व गुणवत्ता वाढीसाठीदेखील फायदा होणार आहे.

व्हिएतनाममधील हॅपेसेन कंपनीच्या जनरल डायरेक्टर नॅग्यायेन डयुक हाँग, यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय तज्ञांनी नुकतेच डीकेटीईस व इन्स्टिट्यूटच्या विविध विभागांना भेटी दिल्या. त्यावेळी त्यांनी येथील संशोधनात्मक कार्य अद्वितीय आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. डीकेटीई व हॅपेसेन यांच्यात काही मुद्द्यांवर चर्चा झाल्यानंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. हॅपेसेन ही व्हिएतनाममधील नामवंत कंपनी असून, तिच्याद्वारे व्यापारी व तांत्रिक कन्सल्टंन्सी करण्याबरोबरच संयुक्तपणे कार्यशाळा, इंडस्ट्रीयल संशोधन व संयुक्त सेमिनार्स राबविले जातात.

या कराराबद्दल डीकेटीई संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, संस्थेचे व्हाइस चेअरमन प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. या करारासाठी इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रशासकीय प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. आर. एल. गोटीपामूल यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZQYBW
Similar Posts
‘डीकेटीई’ला ‘बेस्ट ट्रेनिंग अ‍ॅंड प्लेसमेंट’ पुरस्कार प्रदान इचलकरंजी : येथील वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी तसेच व्यवस्थापनशास्त्राचे अभ्यासक्रमाचे शिक्षण देणाऱ्या ‘डीकेटीई’ संस्थेला वर्ल्ड एज्युकेशन समिटमध्ये बेस्ट प्लेसमेंट अ‍ॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ‘डीकेटीई’च्या वतीने एमबीए विभागप्रमुख प्रा. एस. आर. पाटील यांनी डॉ. रवी गुप्ता आणि कमिशनर डॉ
रेसिंग चॅंपियनशिपमध्ये ‘डीकेटीई’चा संघ द्वितीय इचलकरंजी : ‘डीकेटीई’च्या टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटच्या ड्रिफ्टर्स संघाने ‘राष्ट्रीय अ‍ॅटो इंडिया रेसिंग चॅंपियनशिप २०१८’ स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. विविध राज्यांतील सुमारे ७०हून अधिक संघानी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता
‘जागतिक शैक्षणिक गुणवत्तेत ‘डीकेटीई’ अव्वल’ इचलकरंजी : ‘आधुनिक डिजिटलायझेशन युगात ‘डीकेटीई’ने शैक्षणिक क्षेत्रात दिलेली सेवा, संशोधन व विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावर केलेले शैक्षणिक कार्य यांमुळे आज ‘डीकेटीई’चा ब्रँड अधोरेखीत होत आहे,’ असे गौरवोद्गार ‘किर्लोस्कर-टोयाटा’चे सीओओ कॅनिचरो कॅम्बे यांनी काढले.
‘डीकेटीई’च्या ३५ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीत निवड इचलकरंजी : डीकेटीई संस्थेच्या इंजिनीअरिंग विभागामध्ये कॅपजेमिनी या कंपनीने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संस्थेच्या सर्वाधिक ३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language